अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका भरती 2024: कामाचे ठिकाण, वेतन,बदली अभ्यासक्रम सर्व जाणून घ्या.

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024: शहरी भागात संधी, बदली संदर्भातील महत्त्वाची माहिती.

महाराष्ट्रातील अंगणवाडी मुख्य सेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी महत्त्वाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी इच्छुक महिला उमेदवारांना भरपूर संधी उपलब्ध असून, विविध शहरांमध्ये काम करण्याची आणि बदलीची प्रक्रिया कशी असेल, परीक्षेच्या स्वरूप काय असेल वेतन आणि अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका भरती प्रक्रिया आणि पदाचे स्वरूप.

पदाचे नाव: अंगणवाडी मुख्य सेविका (पर्यवेक्षिका)
पात्रता: कोणत्याही शाखेची पदवीधर महिला
वेतनश्रेणी: ₹35,400 – ₹1,24,000 (इन-हँड वेतन साधारण ₹50,000 पर्यंत)
कामाचे ठिकाण:महाराष्ट्रातील शहरी भाग
जबाबदारी: 25 अंगणवाडी केंद्रांवर लक्ष ठेवणे व त्यांचे निरीक्षण.

बदली आणि जिल्हा निवडीचे नियम.

  • बदलीसाठी तयारी गरजेची:या पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात बदली होऊ शकते.
  • जिल्हा निवड शक्य नाही: उमेदवारांना स्वतःहून जिल्हा निवडण्याचा पर्याय दिला जाणार नाही. शासन त्यांची नियुक्ती कोणत्याही शहरी जिल्ह्यात करू शकते.
  • प्रशिक्षण: निवड झालेल्या उमेदवारांना शासनामार्फत आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अंगणवाडी भरती परीक्षा आणि अभ्यासक्रम

  • इ-परीक्षेचा प्रकार: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका.
  • एकूण प्रश्न: 100 प्रश्न
  • वेळ: 90 मिनिटे

मुख्य घटक:

1. मराठी व इंग्रजी भाषा
2. सामान्य ज्ञान
3. अंकगणित व बुद्धिमत्ता
4. संगणक ज्ञान
5. पोषण अभियान
6.एकात्मिक बाल विकास योजना (ICDS कायदे)

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आणि अर्जाची प्रक्रिया

  • अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024
  • अर्ज भरण्याचे संकेतस्थळ: https://icds.gov.in
  • एकूण पदसंख्या: 102 पदे
महत्त्वाचे अटी आणि शर्ती
  • भाषा उत्तीर्णता: निवड झाल्यानंतर उमेदवारांना मराठी आणि हिंदी भाषांमध्ये परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.
  • संगणक साक्षरता प्रमाणपत्र: नियुक्तीनंतर 2 वर्षांच्या आत संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
निवड झाल्यास नवी संधी

अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून निवड झाल्यास शहरी भागात नोकरी करण्याची संधी मिळेल. यासाठी प्रशिक्षण आणि आदेशांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी:

https://icds.gov.in

Leave a Comment