बँक क्लर्क कसे व्हावे ? / How to become a bank clerk?

बँक क्लर्क माहिती मराठी / Bank Clerk Information In Marathi.

How to become a bank clerk?

मित्रांनो भारतात मिडल क्लास युवकामध्ये बँकांचा जॉब स्वप्न असते.ते बँक जॉबसाठी चांगली मेहनत घेतात कारण या जॉबमध्ये मान-सन्मान सोबतच चांगली सॅलरी असते,तसेच बँकिंग क्षेत्रात बँक क्लर्क पद फार महत्त्वाचे आहे.आणि बँकिंग क्षेत्रात फार कमी मोजके पदे आहेत ज्यासाठी दरवर्षी फॉर्म सुटतात.त्यामध्ये एक आहे बँक क्लर्क आणि आजच्या पोस्टमध्ये आपण बँक क्लर्क कसे बनावे यावर संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

बँक क्लर्क कोण असतो आणि त्याची कार्ये काय असतात.? / Who is a bank clerk and what are his functions?

बँक क्लर्क काउंटरवर बसलेले असतात त्यांचे काम बँक ग्राहकांनी दिलेले काम करणे असते.यामध्ये Cash Deposit , Cash Withdrawal , Passbook Entry, RTGS-NEFT , Check Collection इत्यादी कामे असतात.

बँक क्लर्क कसे बनावे? / How to become a bank clerk?

बँक क्लर्क बनण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले ऑनलाईन फॉर्म apply करावा लागेल.
बँक क्लर्क बनण्यासाठी तुम्ही IBPS किंवा SBI या 2 एक्सामच्या माध्यमातून तुम्ही बनु शकता.दोन्ही ठिकाणी जागा वेगवेगळ्या निघतात.
IBPS चे वर्षांतून एकदा फॉर्म सुटतात तेव्हा तुम्ही बँक क्लर्कसाठी फॉर्म भरू शकता.

बँक क्लर्कसाठी पात्रता काय आहे ? / What is the Eligibility for Bank Clerk?

  1. बँक क्लर्कच्या जॉबसाठी मित्रांनो तुम्ही Graduation पास असणे गरजेचे आहे.
  2. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटी,कॉलेजमधून पास होतान त्यांचे सरकारचे मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे.
  3. बँक क्लर्क बनण्यासाठी तुम्ही Science, Commerce,arts कोणत्याही विषयावर Graduation करणे आवश्यक आहे.
  4. बँक क्लर्क जॉबसाठी कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे कारण बँक क्लर्कचे काम ज्यादातर कॉम्प्युटर असते.
  5. तुम्ही फॉर्म भरतांना तुम्हाला त्या लोकल जागेची राज्याची भाषा बोलता येणे गरजेचे आहे.कारण तुम्हाला काउंटर वर ग्राहकांशी संवाद करायला यामुळे सोपे जाते.

बँक क्लर्क वय पात्रता काय असते? / What is Bank Clerk Age Qualification?

बँक क्लर्क पदासाठी कमीत कमी 20 तर जास्तीत जास्त 28 वयोमर्यादा आहे.याशिवाय रिजर्व कॅटेगरीमध्ये सूट असते ज्यामध्ये OBC 3 वर्षे, SC/ ST 5 वर्षे , PWD 10 वर्षे , widow आणि Divorced महिलांसाठी 9 वर्षांची सूट आहे.

बँक क्लर्क फॉर्म भरण्यासाठी किती टक्केवारी पाहिजे?

बँक क्लर्क बनण्यासाठी फक्त तुमचे Graduation होणे गरजेचे आहे.

बँक क्लर्क फॉर्म केव्हा भरावा? / When to Fill Bank Clerk Form?

IBPS दरवर्षी बँक क्लर्कचे फॉर्म सोडतात,सप्टेंबर महिन्यात याभरतीची ऑनलाईन जाहिरात येते.याच वेळेला तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो.जवळपास 24 दिवसांचा अवधी फॉर्म भरण्यासाठी दिला जातो.
बँक क्लर्क फॉर्म भरण्यासाठी जनरल आणि ओबीसीला 600 रुपये, रिजर्व कॅटेगरीतील उमेदवारांना 100 रुपये लागतात.

बँक क्लर्क पेपर स्टेजेस / Bank Clerk Paper Stages

बँक क्लर्कचे पेपर 2 स्टेजेसमध्ये घेतले जातात, यामध्ये पाहिले Prelims Exam आणि दुसरे Mains Exam असतात,या भरतीत Interview नाही होत.

बँक क्लर्क अभ्यासक्रम मराठी / Bank Clerk Syllabus In Marathi

बँक क्लर्क पेपर पास होण्यासाठी तुम्हाला सगळा अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे.Prelims Exam,Mains Exam हे दोन पेपर होतात तसेच दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो.

Prelims Exam Syllabus :-

Prelims Exam मध्ये 3 विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात.यामध्ये 100 प्रश्न असतात 100 मार्क साठी व 60 मिनिटांचा वेळ दिलेला असतो.

  1. 30 गुणांसाठी English विषयांवर 30 प्रश्न आहेत आणि वेळ 20 मिनिटे आहे.
  2. 35 गुणांचे Mathematics विषयावर 35 प्रश्न आहेत आणि वेळ 20 मिनिटे आहे.
  3. Reasoning विषयात 35 गुणांचे 35 प्रश्न असतात आणि वेळ 20 मिनिटे असेल.

Mains Exam Syllabus

जेव्हा तुम्ही Prelims Exam पास होतात त्याच्या काही दिवसात तुम्हाला Mains Exam देयचे असतात.
या पेपरमध्ये 4 विषयात प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये 190 प्रश्न असतात तर मार्क 200 असतात आणि यामध्ये वेळ 160 मिनिट्स दिला जातो.सगळ्या विषयांचा वेगवेगळा वेळ दिला जातो.तर पाहूया कोणत्या विषयाला किती वेळ वर मार्क असतात.

  1. General/ Financial Awareness 50-50 असतात
    आणि उपलब्ध वेळ 35 मिनिटे आहे.
  2. English तून 40 प्रश्न 40 गुणांचे असून 35 मिनिटे वेळ दिला आहे.
  3. Reasoning और Computer चे 50 प्रश्न 60 गुणांचे आहेत आणि वेळ 45 मिनिटे 50 उपलब्ध आहे.
  4. Mathematics मध्ये 50 प्रश्न 50 गुणांसाठी आणि वेळ
    45 मिनिटे असतो.

मित्रांनो दोन्ही पेपर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी भाषेत देऊ शकतात.पेपरच्या वेळेस तुम्हाला तुमच्या कॉम्पुटर मध्ये भाषा निवडायची असते.

Leave a Comment