डॉक्टर कसे व्हावे? | How To Become Doctor In Marathi 2023.

डॉक्टर माहिती मराठी / Docter Information In Marathi.

How To Become Doctor In Marathi

मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करून आपले उज्वल यशस्वी भविष्य करू इच्छित असतो. कोणाला इंजिनिअर बनायचे असते तर कोणाला सायंटिस्ट कोणाला डॉक्टर तर कोणाला प्रोफेसर व्हावे वाटते. जर तुमचा इंटरेस्ट आजारी व्यक्तीच्या सेवेसाठी असेल तर डॉक्टर बनणे तुमच्यासाठी एक चांगला करिअर ऑप्शन आहे.

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये डॉक्टर कसे व्हावे? / How To Become Doctor In Marathi आपण पाहणार आहोत.

डॉक्टर बनण्यासाठी कोणता कोर्स करावा लागेल?

डॉक्टर बनण्यासाठी जो अभ्यास केला जातो त्या कोर्स चे एमबीबीएस असे नाव आहे. एमबीबीएस चा Bachelor of Medicine Bachelor of Surgery फुल फॉर्म आहे. एमबीबीएस चा कोर्स केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बनू शकतात.ही एमबीबीएसची डिग्री घेणे सोपे नसले तरी जे विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात ते यात पास होतात.

एमबीबीएस ऍडमिशन साठी कोणती एंट्रन्स एक्झाम दिली जाते?

एमबीबीएसमध्ये ऍडमिशन साठी तुम्हाला NEET (National Eligibility cum Entrance Test) ची एक्साम द्यावी लागेल तेव्हाच तुम्ही एमबीबीएस साठी ऍडमिशन घेऊ शकतात.NEET चे पेपर दरवर्षी CBSC द्वारा घेतली जाते.तुम्हाला कोणते कॉलेज मिळेल हे तुम्हाला मिळालेल्या रॅंकवर अवलंबून असते. संपूर्ण भारतभर कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते.

डॉक्टर बनण्यासाठी कॉलिफिकेशन काय हवे?

मित्रांनो डॉक्टर बनण्यासाठी तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजेत. बारावी सायन्स मध्ये फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री तुमचे विषय हवेत.

डॉक्टर बनण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?

मित्रांनो एमबीबीएस प्रोग्रॅम करण्यासाठी तुमचे कमीत कमी वय 17 व जास्तीत जास्त 25 असावे तेव्हा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात.

डॉक्टर बनण्यासाठी ऍडमिशन कसे होते?

एमबीबीएस मध्ये ऍडमिशन साठी तुम्हाला NEET ची एक्झाम द्यायची असते.ही परीक्षा तुम्ही बारावीमध्ये असतांना किंवा बारावी पास झाल्यावर देऊ शकतात.
NEET ची एक्झाम झाल्यावर तुम्हाला जे रँक मिळते त्या आधारावर तुम्हाला कॉलेज मिळते.
NEET मध्ये तुमचे जेवढे जास्त रँक राहील तेवढे टॉपचे कॉलेज मध्ये ऍडमिशन तुम्हाला मिळणार असते.

एमबीबीएस चा कोर्स किती वर्षाचा असतो व इंटर्नशिप किती वर्षाची असते?

मित्रांनो हा साडेपाच वर्षाचा कोर्स असतो त्यामध्ये एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते. एमबीबीएस झाल्यानंतर तुम्ही मास्टर डिग्री सुद्धा करू शकतात, ज्याला MS व MD असे म्हटले जाते.MS चा Master Of Surgery हा फुल फॉर्म आहे आणि MD चा Doctor Of Medicine असा फुल फॉर्म आहे. एमबीबीएस झाल्यानंतर तुम्हाला कोणती मास्टर डिग्री करायची आहे हे तुमच्या इंटरेस्टवर अवलंबून आहे.

जर तुम्ही एमडी झाला तर तुम्ही फिजिशियन बनतात तर एम एस केले तर तुम्ही सर्जन डॉक्टर बनतात. MS व MD कोर्स करायला तीन वर्षाचा कालावधी लागतो. व त्यानंतर स्पेशलिझेशन करण्यासाठी दोन वर्षाचा अतिरिक्त कालावधी लागतो.

एमबीबीएस झाल्यानंतर करिअर स्कोप काय आहे?

मित्रांनो एमबीबीएस एक अशी डिग्री आहे ते झाल्यानंतर समाजामध्ये तुमचा मानसन्मान वाढतो. एमबीबीएस झाल्यावर तुम्ही डॉक्टर बनवून सेवा करू शकतात. रुग्णांचा इलाज करण्याबरोबरच तुम्हाला चांगले उत्पन्न मिळते त्यामुळे एक चांगले आयुष्य जगण्यास मदत होते. सुरुवातीच्या काळात तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटल जॉईन करून प्रॅक्टिस करू शकतात किंवा स्वतःचे हॉस्पिटल ओपन करून प्रॅक्टिस करू शकतात.

एमबीबीएस झाल्यावर जॉब कुठे मिळेल?

तुम्हाला माहितीच असेल डॉक्टर झाल्यावर त्या व्यक्तीला जॉबचा विचार करावा लागत नाही. कारण एमबीबीएस झाल्यावर तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकतात. आणि तरीही जॉब करायचे असल्यास खूप संधी उपलब्ध होतात.

तुम्ही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जॉईन करू शकतात किंवा मेडिकल लाईन मध्ये Laboratories , Biomedical Company ,Medical College ,Medical Trust, Health Centre ,Pharmaceutical & Biotechnology Companies ,NGO ,Research Institute etc. अन्य ठिकाणी जॉब करू शकतात.

FAQ

एमबीबीएस कोर्स करायला किती वर्षे लागतात?

एमबीबीएस हा वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम आहे. एमबीबीएस होण्यासाठी विद्यार्थ्यांना ५.५ वर्षे एवढा कालावधी लागतो.

डॉक्टर बनण्यासाठी किती खर्च येतो?

खासगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फी वेगवेगळी असते. सरकारी कॉलेजमधून डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला अंदाजे 5 लाख ते 10 लाख पर्यंत फी भरावी लागेल.

बारावीनंतर डॉक्टर होण्यासाठी काय करावे?

सगळ्यात पहिले दहावी पास झाल्यावर बारावीमध्ये सायन्स शाखेतून जीवशास्त्र विषय (PCB) निवडा.
NEET परीक्षेची तयारी करा.
NEET प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करा आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा.
वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करा आणि चांगल्या मार्कनी उत्तीर्ण व्हा.

NEET परीक्षेत बसण्यासाठी बारावीमध्ये किती टक्केवारीची आवश्यकता आहे?

ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी बारावीमध्ये ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे तर SC/ST/OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना NEET मध्ये ४०% गुण आवश्यक आहेत. जर तुम्हाला यापेक्षा कमी टक्केवारी असली तर तुम्ही NEET साठी अर्ज करू शकत नाही.

Leave a Comment