बंपर कृषी सेवक भरती 2023 : कृषी विभागात 2077 जागांसाठी भरती ! शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया जाणून घ्या !

कृषी सेवक भरती माहिती मराठीत / Krushi Sevak Bharti Information In Marathi 2023.

कृषी सेवक भरती 2023 , Krushi Sevak Bharti Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या पोस्टमध्ये कृषी सेवक भरती विषयी माहिती पाहणार आहोत. कृषी सेवक भरती जाहिरात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात? कृषी सेवकास वेतन काय आहे? याचाविषयीची माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये मध्ये घेऊन आलो आहोत. तसेच काही मुलांची शंका आहे की अंतिम वर्षाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का? ट्रेनिंग किती दिवसांची असणार आहे? याविषयी संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये मिळणार आहे.

कृषी सेवक भरती तपशील मराठीत / Krushi Sevak Bharti Mahiti In Marathi 2023.

विभागानुसार कृषी सेवक पदांचा तपशील :

विभाग पदसंख्या
छ. संभाजीनगर 196
पुणे 188
ठाणे  294
कोल्हापूर 250
लातूर 170
नागपूर 448
अमरावती 227
नाशिक 336

कृषी सेवक भरतीसाठी पात्रता काय आहे? / Krushi Sevak Bharti Patrata 

एग्रीकल्चरमध्ये डिप्लोमा आणि डिग्री घेतलेले विद्यार्थी कृषी सेवक पदासाठी फॉर्म भरण्यास पात्र असतील. या व्यतिरिक्त इतर कोणतीही ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरण्यास पात्र नसतील.

कोणता विषयाच्या व्यक्ती अप्लाय करू शकतो?

इंजीनीरिंग ,बीएस्सी, बीकॉम असे कोणतेही पदवीधर अर्ज करू शकत नाही. फक्त कृषी विषययातील पदवीधर व कृषीमध्ये डिप्लोमा घेतलेले उमेदवार पात्र असणार आहे. या पेक्षाही जास्त कोणतीही डिग्री तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकतात.

कृषी सेवक भरतीसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे? / Krushi Sevak Bharti 2023 Syllabus.

महाराष्ट्र राज्य कृषी सेवक भरती ही आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे. कृषी सेवक भरतीसाठी पुढीलपैकी अभ्यासक्रम असणार आहे.

विषय प्रश्न संख्या गुण
मराठी २० २०
इंग्रजी २० २०
सामान्य ज्ञान २० २०
बौद्धिक चाचणी २० २०
कृषी विषय ६० १२०
एकूण १४० २००

 

कृषी सेवकास वेतन काय आहे?
कृषी सेवकास ₹16,000 प्रतिमाह वेतनमान आहे.

कृषी सेवक भरती एकूण पदसंख्या किती आहे?
कृषी सेवक भरती महाराष्ट्र राज्य एकूण पदसंख्या 2077 आहे.

पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात का?

कृषी विषयातील पदवीच्या शेवटच्या वर्षात तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही किंवा अप्लाय करण्यास पात्र असणार नाही. शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या वर्षात अभ्यास तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र राहणार नाही, ही गोष्ट जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. परंतु फॉर्म भरण्याच्या पूर्वी तुमच्याकडे जर डिग्री येत असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. तुमची डिग्रीनंतर येणार असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही

कृषीसेवक झाल्यावर कृषी सहायकचे पद कधी मिळणार?

समजा तुम्ही कृषीसेवक 2023 मध्ये कृषी सेवक झाले असून तुम्हाला जॉइनिंग मिळाली. त्यानंतर एक वर्ष तुम्हाला 2024 पर्यंत कामावर ठेवले जाईल व तुमचे काम कसे आहे हे पाहिले जाईल तुम्ही किती इमानदारीने काम करता हे पाहिले जाईल. या कालावधीमध्ये तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे केस झाले आहेत का याची सर्व चौकशी केली जाईल.

त्यानंतर तुम्हाला आणखी दोन वर्षाची एक्स्ट्रा मुदत देण्यात येईल. 2026 पर्यंत तुम्हाला व्यवस्थित, कोणतेही भ्रष्टाचार न करता काम करायचे आहे. तुमचे 3 वर्षाचे काम पाहिल्यानंतर तुम्हाला कृषी सहाय्यक पदावर नियुक्त केले जाईल. पण तीन वर्षाचा कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवारास पदाच्या उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार कृषी सहायक या नियमित पदावर नियुक्ती देण्यातील पदे उपलब्ध पाहिजे.

तुमची कामगिरी चांगली असेल व तुमच्यावर कोणतीही चौकशी नसेल व पद उपलब्ध असतील तर तुम्ही 3 वर्षांनी कृषी सेवक पासून कृषी सहायक तुम्ही बनवून जाणार आहे.

Official website

कृषी सेवक भरती वेबसाईट

Leave a Comment