ग्राम पंचायतांच्या योजनांचा माहिती देणारे अँप
भारत सरकारने सुरु केलेला मेरी पंचायत ऍप ग्राम पंचायतांच्या डिजिटल युगात प्रवेश करण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे. हा ऍप लोकांना त्यांच्या पंचायतसंबंधी सर्व माहिती सहजगत्या उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवतो. आता, शेतकरी आपल्या परिसरातील हवामान, सरकारी योजना, निधीची माहिती यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर डिजिटल पद्धतीने नजर ठेवू शकतील. मेरी पंचायत ऍपच्या माध्यमातून सुमारे 2,50,000 ग्राम पंचायतांचा डेटा थेट ऍपवर उपलब्ध असेल.
हवामान पूर्वानुमान आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचे
मेरी पंचायत ऍपचा एक मोठा फायदा म्हणजे हवामानाची अपडेट मिळणे. शेतकऱ्यांना स्थानिक तापमान, पाऊस, वारा याबद्दलची माहिती मिळू शकेल, ज्यामुळे बियाणे टाकणे, पाणी देणे, पिकांची काढणी या कामांसाठी योग्य नियोजन करता येईल. तसेच, चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींविषयी अलर्ट मिळतील, ज्यामुळे आपत्ती काळात योग्य ती खबरदारी घेता येईल.
मेरी पंचायत अँप वापरण्यास सुलभ आणि सर्वसमावेशक माहिती
मेरी पंचायत अँप वापरणे खूप सोपे आहे. यासाठी Google Play Store किंवा Apple App Store वरून ऍप डाउनलोड करून आपल्या ग्राम पंचायत निवडायची आहे. त्यानंतर, त्यात फंड, सोशल ऑडिट, आणि इतर विभागांची माहिती मिळते. पंचायत निधी, खर्च, सरकारी योजना, पंचायतीच्या मिटींग्स याबाबतची माहितीही पाहता येते.
मेरी पंचायत अँप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
शेतकऱ्यांसाठी ही app एक गेम चेंजर ठरू शकते. पंचायतीच्या निधी आणि खर्चाचे पारदर्शकता वाढेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हवामानावर आधारित शेतकामाच्या योग्य योजना आखता येतील.