नर्स कसे बनावे? / Nurse Kase Vhave?
मित्रांनो हेल्थ हे असे सेक्टर आहे त्याच्यामध्ये जॉबची कधीच कमी होत नाही आणि हेल्थ सेक्टर मध्ये सर्वात जास्त जॉबच्या अपॉर्च्युनिटी असतात. मेडिकल फिल्डमध्ये नर्सची डिमांड खूप असते त्याचबरोबर या पोस्टला रिस्पेक्ट दिली जाते. नर्सची डिमांड फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरात आहे आणि त्यामध्ये भारतीय नर्सची जगभरात खूप मागणी आहे. जगभरातील हॉस्पिटल भारतीय नर्सलला भरती करू इच्छित असतात.
नर्स कसे व्हावे? / Nursing Course Information In Marathi 2024.
आजच्या आपल्या पोस्टमध्ये नर्स कसे बनावे?/ Nursing Course Information In Marathi या विषयी माहिती आपण घेऊन आलो आहोत. नर्स बनण्यासाठी पात्रता काय आहे? नर्स बनण्यासाठी वयाची अट काय आहे? अशाच प्रकारच्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत.
नर्सचे काम काय असते? / Nursing Course Details In Marathi.
मित्रांनो या जगात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो, जे की रुग्णांचा इलाज करतात. सरकारी हॉस्पिटल असो किंवा खाजगी हॉस्पिटल तुम्ही पाहिले असेल की तिथे डॉक्टरांपेक्षा नर्सची संख्या जास्त असते. कारण डॉक्टर जेव्हा पण एखाद्या रुग्णाचे उपचार करतात किंवा ऑपरेशन करतात तेव्हा त्या रुग्णाचे देखभाल करण्याचे काम नर्स करत असतात. त्यामध्ये रुग्णांची देखभाल करणे, वेळेवर रुग्णांना औषध देणे, ड्रेसिंग करणे इत्यादी प्रकारचे कामे नर्स करत असते. त्यामुळे डॉक्टरांनंतर हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त नर्सची गरज असते.
नर्स बनण्यासाठी कॉलिफिकेशन काय आहे?
तुम्हाला नर्स बनायचे असेल तर तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा करायचा असतो. जर तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री करायची असेल तर तुम्ही बारावीनंतर तो कोर्स करू शकतात. त्यानंतर तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स बनू शकतात.
नर्स बनण्यासाठी कोणता कोर्स करावा लागेल? / Nursing Course Mahiti In Marathi.
नर्स बनण्यासाठी तुम्ही खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करू शकतात खाली आम्ही नर्स बनण्यासाठीचे कोर्स दिलेले आहेत.
ANM (Auxiliary Nurse Midwife\Health Worker) :-
ANM हा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे जो फक्त मुलीचं करू शकतात.या डिप्लोमा कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही बारावी इंग्लिश विषय घेऊन पास असणे गरजेचे आहे.
GNM (General Nursing And Midwifery)
GNM कोर्स करण्यासाठी अर्जदारचा बारावीमध्ये फिजिक्स, बायलॉजी, केमिस्ट्री विषय घेऊन पास होणे गरजेचे आहे.GNM चा कोर्स पुरुष व स्त्रिया दोघेही करू शकतात.या कोर्सचा अवधी 3 वर्षाचा असतो त्यानंतर 6 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते.
B.Sc Nursing
मित्रांनो B.Sc Nursing एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे.त्यामुळे याकोर्सला बॅचलर डिग्री किंवा अंडर ग्रॅज्युएट डिग्री असेही म्हणतात.या कोर्सची कालावधी 4 वर्षांचा असतो व हा कोर्स पुरुष व महिला दोन्ही करू शकतात.त्याचबरोबर उमेदवार बारावी मध्ये फिजिक्स, बायलॉजी, केमिस्ट्री विषय घेऊन पास असावा त्यानंतर तुम्ही या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पात्र असतात.
नर्सिंगसाठी कुठे व कसे ॲडमिशन मिळेल?
तुम्ही खासगी संस्थामध्ये डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतात किंवा एंट्रन्स पास करून सरकारी संस्थांमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. पण जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल.
नर्सिंगसाठी किती फी असते?
- नर्सिंगमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमच्यासमोर दोन प्रकारचे ऑप्शन असतात.
- प्रायव्हेट कॉलेज किंवा सरकारी कॉलेज यापैकी तुम्ही कोणत्याही ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात.
- जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुमची फी त्या कॉलेजच्या हिशोबाने द्यावी लागेल जी की कोणत्याही सरकारी कॉलेज पेक्षा जास्तच असते.
- जर तुम्ही एंट्रन्स पास करून सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला खूप कमी फी असते.
- तुम्ही सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन कमीतकमी फीमध्ये नर्सिंगचा कोर्स करू शकतात.
नर्स बनण्यासाठी तयारी कशी करायची?
- मित्रांनो जर तुम्हाला नर्सिंग सरकारी कॉलेजमधून करायची असेल तर तुम्हाला पहिल्या पासूनच तयारी करावी लागेल.
- तुम्ही बारावीला ऍडमिशन घेतल्यावर लगेच नर्सिंगची तयारी सुरू केली तर तुमच्यासाठी फायदेशीर राहील.
- एंट्रन्स पेपरच्या तयारीसाठी तुम्हाला बुक स्टॉल वर खूप पुस्तके मिळतील.
- तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये नर्सिंगसाठी ऍडमिशन घेणार आहात तिथला संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या त्यानंतर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपे जाईल.
नर्सिंग कोर्स स्कोप काय आहे?
आजच्या वेळेला फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा नर्सिंग प्रोफेशनला खूप जास्त डिमांड आहे. हॉस्पिटल क्लिनिक्स यांची संख्या दरवर्षी वाढत आहे, त्यामुळे चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्सला जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात सुद्धा नर्सची वेकन्सी मोठ्या प्रमाणात निघत असते.
नर्सिंग केल्यावर जॉब कुठे मिळतात?
एका नर्सला जॉबची कमी कधीच नसते.नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर नर्सकडे एकापेक्षा एक भारी जॉबच्या संधी असतात.आम्ही खाली काही नर्सिंग जॉब दिलेले आहेत.
- Government Hospital
- Private Hospital Nursing Home
- Indian Red Cross Society
- Indian Nursing Counsil
- State Nursing Counsil
- Private Clinic
- Community Health Center
नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर जॉब कसा मिळेल?
- आपल्या भारतात आणि संपूर्ण जगात हेल्थ सेकटर असे क्षेत्र आहे ज्यामध्ये जॉबच्या खूप साऱ्या संधी आहे.
- जर तुम्ही खासगी हॉस्पिटलमध्ये किंवा नर्सिंगमध्ये काम करू इच्छित असाल तर सरळ तिथे इंटरव्यू देऊन जॉब मिळवू शकतात.
- त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये खूप साऱ्या संधी नर्ससाठी दरवर्षी असतात.
- प्रत्येक वर्षी सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सची वेकेन्सी निघते तर तुम्ही वेळोवेळी माहिती घेऊन तिथे फॉर्म भरून जॉब मिळवू शकतात.
नर्सला पगार किती असतो?
प्रत्येक व्यक्ती जॉब करण्याअगोदर पगार किती असेल याचा विचार करतच असतो.जर तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये इतका पगार मिळेल.व जसा जसा तुमचा अनुभव वाढेल तसा तुमचा पगार वाढत जाईल.सरकारी क्षेत्रात तुम्हाला चांगला पगार मिळेल.
खाली काही टॉपची नर्सिंग कॉलेजची लिस्ट दिली आहे
-All India Institute of Medical Sciences (AIIMS)
– Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS)
– Banaras Hindu University, UP
– Post Graduate Institute of Medical Education and Research (PGIMER)
– Christian Medical College
– King George Medical University
-National Institute of Mental Health and Neurosciences (NIMHANS)
– Sree Chitra Tirunal Institute for Medical Sciences and Technology
– Amrita Vishwa Vidyapeetham