समाज कल्याण विभाग : गृहपाल भरती अभ्यासक्रम आणि आवश्यक पुस्तके याबाबत संपूर्ण माहिती.

समाज कल्याण विभागाच्या गृहपाल भरतीसाठी तयारी: नियोजन व अभ्यास कसे करायचे?

समाज कल्याण विभाग : गृहपाल भरती अभ्यासक्रम आणि आवश्यक पुस्तके याबाबत संपूर्ण माहिती.

समाज कल्याण विभागाच्या गृहपाल भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी फक्त महिलांना अर्ज करता येणार असून 92 पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. तुम्ही या जागेसाठी अर्ज https://sjsa.maharashtra.gov.in/या अधिकृत वेबसाईटवरून करू शकतात . चला, या परीक्षेसाठी आवश्यक नियोजन, अभ्यासक्रम, आणि योग्य तयारी कशी करायची याची माहिती घेऊया.

1. परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम

  • परीक्षा संगणकावर आधारित (Computer Based Online Exam) असणार आहे. यात 100 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातील.
  • निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आत्मविश्वासाने द्यावे.

विषयवार प्रश्नसंख्या:

  • मराठी व्याकरण: 25 प्रश्न
  • इंग्रजी व्याकरण: 25 प्रश्न
  • सामान्य ज्ञान: 25 प्रश्न
  • बौद्धिक चाचणी: 25 प्रश्न

एकूण 100 प्रश्न असतील 2 गुणांसाठी म्हणजे एकुण 200 गुणांचा पेपर असणार आहे.

2. योग्य पुस्तकांची निवड

पुस्तकांची योग्य निवड आणि सतत रिव्हिजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील काही विशिष्ट लेखकांची पुस्तके उपयुक्त ठरतील.

मराठी व्याकरण:

  1. मो.रा वाळंबे
  2. बालासाहेब शिंदे

इंग्रजी व्याकरण:

  1. बाळासाहेब शिंदे
  2.  एम. जे. शेख यांची पुस्तके

बौद्धिक चाचणी:

  1. नितिन महाले सर
  2. कोकण प्रकाशनचे सतीश वसे
  3. सचिन ढवळे यांचे पुस्तक

सामान्य ज्ञान (GK/GS):

  1. इयत्ता 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकांचे वाचन
  2. एकनाथ पाटील यांचा ठोकळा
  3. चालू घडामोडींसाठी: पृथ्वी परिक्रमा, सिंप्लिफाइड, देवा जाधवर यांची पुस्तके

3. अभ्यासाचे नियोजन

तयारीसाठी किमान 6 तासांचा रोजचा अभ्यास आवश्यक आहे. योग्य नियोजनाने अभ्यास केल्यास तुम्हाला परीक्षेत चांगले यश मिळवता येईल.

सोमवार ते शनिवारचे अभ्यास वेळापत्रक:

  • 2 तास:बौद्धिक चाचणीची प्रॅक्टिस
  • 2 तास: सामान्य ज्ञान आणि जनरल स्टडीज (इतिहास, भूगोल, विज्ञान)
  • 1 तास: मराठी व्याकरण
  • 1 तास: इंग्रजी व्याकरण

रविवारीचे नियोजन:

  • 1 प्रश्नपत्रिका सोडवा (पूर्वीच्या प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिका)
  • 2 तास: चालू घडामोडींचा आढावा
    अभ्यासात मागे राहिलेल्या विषयांचे रिव्हिजन करा.

4. अभ्यास पद्धतीतील लवचिकता

  • जर रिजनिंग किंवा गणितात मजबूत असाल, तर त्या विषयासाठी कमी वेळ द्या आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करा.
  • सामान्य ज्ञानात चांगले मार्क मिळवण्यासाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवा.
  • सतत रिव्हिजन आणि सराव तुम्हाला परीक्षेच्या वेळेस आत्मविश्वास मिळवून देईल.

5. सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा का?

तयारीच्या काळात सकारात्मक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करावा लागतो, त्यामुळे वेळोवेळी स्वतःला प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि सराव यामुळेच यश शक्य होईल.

6. शेवटचा सल्ला

तुमच्या तयारीत सातत्य ठेवा आणि योग्य वेळापत्रक पाळा. प्रश्नपत्रिकांचा सराव हा अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. गृहपाल भरतीच्या परीक्षेसाठी तुमचा ठोकळा आणि चालू घडामोडींची तयारी पक्की ठेवा.

ही परीक्षा तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. नियोजनबद्ध तयारी केल्यास तुमचे यश निश्चित आहे. सर्व उमेदवारांना भरती परीक्षेसाठी शुभेच्छा!

Leave a Comment