टॉप 5 पॅरामेडिकल कोर्स माहिती मराठीत | Top Paramedical Course Information in Marathi.

बेस्ट पॅरामेडिकल कोर्स माहिती / Top Paramedical Course Information in Marathi.

Paramedical Course Information in marathi

आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण टॉपचे पॅरामेडिकल कोर्सची माहिती पाहणार आहोत.जर तुम्हाला मेडिकल सेकटर मध्ये काम करण्याची आवड असेल तर या टॉप 5 पॅरामेडिकल कोर्सला तुम्ही एक चांगला करियर ऑप्शन म्हणून पाहू शकता.

आजच्या पोस्टमध्ये डायलिसिस टेक्निशियन,ऑप्टोमेट्री कोर्स,फिजिओथेरपी कोर्स,रेडियोलॉजी कोर्स,मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या पाच टॉप पॅरामेडिकल कोर्सची माहिती देणार आहोत.

सर्वोत्तम पॅरामेडिकल कोर्स कोणता आहे? / What is the best paramedical course?

खाली आम्ही काही बेस्ट पॅरामेडिकल कोर्सची माहिती घेऊन आलो आहोत.

मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्स / Medical Lab Technology Course :-

मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये जेवढे पण मेडिकलच्या क्षेत्रात रक्ताच्या संबंधित कामे असतात जसे की रक्त जमा करणे,रक्ताची तपासणी करणे इत्यादी कामे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये येतात.जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे काही उपचारासाठी जातात तेव्हा ताप सर्दी खोकला इत्यादी आजारावर डॉक्टर गोळ्या औषध देतात.

काही वेळा गोळ्या औषध देऊन सुद्धा आजार बरे होत नाही. त्यावेळी आजार नेमका काय आहे? हे शोधण्यासाठी डॉक्टर प्रॉपर टेस्ट करण्यासाठी मेडिकल लॅबला रक्त लघवी चेक करण्यासाठी सांगतात. मेडिकल लॅबच्या टेस्टच्या आधारावर डॉक्टर योग्य ते औषध उपचार करू शकतात त्यामुळे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्सची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे.

मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्स करायला किती कालावधी लागतो?

डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्सचा कालावधी 2 वर्षाचा आहे आणि बॅचलर इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे.

मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्स पात्रता काय आहे?

डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्ससाठी काही कॉलेजची पात्रता दहावी पास आहे तर काही कॉलेजची बारावी पास आहे.
बॅचलर इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी कोर्ससाठी पात्रता तुमचे 12th सायन्स PCB किंवा PCM घेऊन पास असायला हवे.

डायलिसिस टेक्निशियन कोर्स / Dialysis technician course :-

डायलेसिस प्रक्रियेला सोप्या स्वरूपात समजायचे झाले तर आपल्या शरीरात रक्ताला फिल्टर करणे त्यामुळे आपले शरीर प्रॉपर स्वरूपात फंक्शन करत असते हे किडनीचे काम असते. आपल्या शरीरात बरेच सारे असे घटक असतात ज्यांची शरीराला गरज नसते. जसे की लघवीच्या स्वरूपात शरीरातील नको असलेले घटक बाहेर पडत असतात.

जर कोणाच्या शरीरातील किडनी फेल झाली तर किडनी प्रॉपर पद्धतीने रक्त व इतर घटक फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे असे होते की शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडत नाही त्यामुळे त्या व्यक्तीचे सर्व प्रॉपर वर्क करत नाही. त्यामुळे किडनी फेल झालेल्या व्यक्तीला डायलिसिस करणे फार गरजेचे असते. डायलेसिसमध्ये आर्टिफिशली डायलेसिस मशीनद्वारे शरीरातील रक्ताला फिल्टर केले जाते जेणेकरून किडनी फेल झालेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी योग्य पद्धतीने काम करते. या सर्व प्रोसेसला डायलिसिस म्हणतात आणि डायलिसिस करण्यासाठी डायलिसिस टेक्निशियनचे काम असते.

डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स करायला किती कालावधी लागतो?

डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर व डिप्लोमा असे दोन प्रकारचे कोर्स आहे बॅचलर ऑफ डायलिसिस कोर्स करायला 3 वर्षांचा कालावधी लागतो आणि डिप्लोमा इन डायलिसिस करायला 2 वर्षांचा कालावधी लागतो.बॅचलर कोर्समध्ये 6 सेमिस्टर असतात तर डिप्लोमा कोर्समध्ये 4 सेमिस्टर असतात.

डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स पात्रता

बॅचलर ऑफ डायलिसिस कोर्ससाठी तुम्ही बारावी सायन्समधून पास असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा इन डायलिसिस कोर्ससाठी दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे.

ऑप्टोमेट्री कोर्स / Optometry Course :-

ऑप्टोमेट्रीच्या कोर्समध्ये डोळ्या संबंधित प्रॉब्लेम वर तुम्हाला कामे असतात.जसे की डोळे चेक करणे,लेन्स बनवणे,डोळ्याचे नंबर ठरवणे ही सर्व कामे ऑप्टोमेट्री टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये येतात.आजकाल बऱ्याच साऱ्या कंपनी लेन्सकार्ट, चष्मा डॉटकॉम सारख्या किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत तिथे ऑप्टोमेट्रीची गरज पडते.

ऑप्टोमेट्री टेक्नॉलॉजी कोर्स करायला किती कालावधी लागतो?

ऑप्टोमेट्रीमध्ये बॅचलर व डिप्लोमा असे दोन कोर्सेस असतात. डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री चा कोर्स दोन वर्ष असतो आणि बॅचलर इन ऑप्टोमेट्री चा कोर्स चार वर्षाचा असतो.

ऑप्टोमेट्री टेक्नॉलॉजी कोर्स पात्रता

डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री हा कोर्स काही कॉलेज तुम्हाला दहावी वर ऍडमिशन देतील तर काही कॉलेजला बारावी कंपल्सरी हवी असते.
बॅचलर इन ऑप्टोमेट्री कोर्ससाठी बारावी सायन्स बायलॉजी किंवा बारावी सायन्स मॅथच्या बेसिकवर युनिव्हर्सिटी तुम्हाला ऍडमिशन देऊ शकतात.

फिजिओथेरपी कोर्स / Physiotherapy Course

फिजिओथेरपीमध्ये पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघेदुखी व इतर शरीरातील अवयवावर औषध उपचार बरोबरच रुग्णांना फिजिओथेरपीद्वारे थेरेपीद्वारे उपचार केले जातात.या सर्व प्रॉब्लेमवर जे फिजिशन व ऑर्थोपेडीशन आहेत ते प्राधान्य देत असतात की इतक्या दिवसाची तुम्हाला थेरपी घ्यावी लागेल.त्यामुळे फिजिओथेरपी व्यायामातुन या सर्व आजारावर कायमची मात करता येईल.

फिजिओथेरपी कोर्स करायला किती कालावधी लागतो?

डिप्लोमा इन फिजिओथेरपी कोर्स हा 2 वर्षांचा असतो तर बॅचलर इन फिजिओथेरपीचा कोर्स 4 वर्षांचा आहे.

फिजिओथेरपी कोर्स पात्रता काय आहे?

बॅचलर इन फिजिओथेरपीचा कोर्स करण्यासाठी तुम्ही बारावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय घेऊन पास असणे गरजेचे आहे. तसेच बरेच सारे कॉलेज एंट्रन्स एक्झाम घेऊन सुद्धा ऍडमिशन देतात.
डिप्लोमा इन फिजिओथेरपीसाठी तुम्हाला दहावी किंवा बारावी वर ऍडमिशन मिळू शकते हे डिपेंड करते की तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ऍडमिशन करत आहात.

रेडियोलॉजी कोर्स / Radiography & Imaging Technology Course :-

रेडियोलॉजीमध्ये इमेजेसच्या साह्याने आजरांना ओळखले जाते आणि उपचार केले जातात. जसे की सोनोग्राफी, एम.आर.आय, सिटीस्कॅन इत्यादी या सगळ्यांच्या मदतीने शरीरामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे कुठे फ्रॅक्चर आहे ही सर्व माहिती मिळते व आजारावर उपचार केले जातात.

रेडियोलॉजी कोर्स करायला किती कालावधी लागतो?

डिप्लोमा इन रेडियोलॉजी कोर्स करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी आहे आणि बॅचलर इन रेडोलॉजी कोर्स करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी आहे.

रेडियोलॉजी कोर्स पात्रता काय आहे?

डिप्लोमा इन रेडियोलॉजी कोर्ससाठी काही कॉलेजची पात्रता दहावी पास आहे तर काही कॉलेजची बारावी पास आहे.
बॅचलर इन रेडोलॉजी कोर्ससाठी पात्रता तुमचे बारावी सायन्स PCB किंवा PCM घेऊन पास असायला हवे.

Leave a Comment